अणूचे अंतरंग

अणुभट्टी

views

3:06
आज अणुऊर्जेपासून मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती करून ऊर्जेची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यासाठी विविध अणुभट्ट्या उभारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. “अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारे संयत्र म्हणजे अणुभट्टी होय.” अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून अणूमध्ये असणारी केंद्रकीय ऊर्जा मुक्त केली जाते. उदा. युरेनिअम 235 इंधन. मंद गतीचा न्युट्रॉनचा मारा केला की, युरेनिअम 235 या समस्थानिकाचे केंद्रकीय विखंडन होते आणि क्रिप्टॉन-92 व बेरिअम-141 या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन तयार होतात. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते U235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. केंद्रकांत खूप मोठ्या प्रमाणात केंद्रकीय अणुऊर्जा मुक्त होते. या अणुउर्जेमूळे स्फोट होऊ नये. यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करावी लागते. त्यासाठी काही गोष्टींचा वापर करावा लागतो.