अणूचे अंतरंग

न्यूट्रॉन

views

3:39
आता आपण न्यूट्रॉनविषयीची माहिती घेऊ या. न्यूट्रॉन हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण आहे. तो ‘n’ या इंग्रजी अक्षराच्या संज्ञेने दर्शवला जातो. केंद्रकातील न्यूट्रॉनच्या संख्येसाठी ‘n’ ही संज्ञा वापरली जाते. 1u इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान 1u इतके आहे. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की, जवळपास प्रोटॉनच्या वस्तुमानाइतकेच हे वस्तुमान आहे.