पदार्थ आपल्या वापरातील

दैनंदिन जीवनातील काही क्षारांची माहिती

views

04:54
आपण रोजचे जेवण जेवतो, त्या अन्नाला मिठामुळे चव येते. म्हणजेच हे मीठ अन्नाला रुचकर बनवते. अन्नाला खारट चव देणारे मीठ हा आपल्या जीवनात सर्वाधिक वापरण्यात येणारा क्षार आहे. मीठ या क्षारालाच रासायनिक भाषेत सोडिअम क्लोराइड असे म्हणतात. सोडिअम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्या उदासिनीकरण अभिक्रियेने सोडिअम क्लोराइड म्हणजेच मीठ तयार होते. म्हणजेच NaOH + HCL  Nacl + H2O ही अभिक्रिया घडून येते. सोडिअम क्लोराइड हा क्षार उदासीन आहे व त्याच्या जलीय द्रावणाचे PH मूल्य 7 आहे. सोडिअम क्लोराइडचे गुणधर्म: 1) हे एक रंगहीन व स्फटिकी आयनिक संयुग आहे. याच्या स्फटिकी रचनेत स्फटिकजल नसते. 2) हा क्षार उदासीन असून याची चव खारट आहे. 3) औद्योगिक प्रक्रियांमध्ये सोडिअम क्लोराइडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 4) सोडिअम क्लोराइडचा उपयोग सब – फ्रीझिंग हवामानात रोडवेचे डी-आयसिंग यात केला जातो.