पदार्थ आपल्या वापरातील

दुर्गंधीनाशक

views

04:50
सूक्ष्मजंतूंमुळे शरीराला येणाऱ्या घामाचा वास सुक्ष्मजंतूनी केलेल्या विघटनामुळे येतो. हा वास म्हणजेच दुर्गंध न येण्यासाठी तुम्ही काय करता? डिओ वापरतो. असा दुर्गंधीनाशक पदार्थ म्हणजे डिओ वापरला की दुर्गंध येत नाही. आपल्याला दिवसभर प्रफुल्लित म्हणजे आनंदी राहण्यासाठी छान वास येणारा डिओडरंट आवडतो. शाळा, कॉलेज, ऑफिसचे कर्मचारी डिओ वापरतात. टीव्हीवरील जाहिरातींमुळे डिओ वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये पॅराबेन्स (मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, बेन्झाइल, आणि ब्युटाइल अल्कोहोल) चे प्रमाण जास्त असते. तसेच अॅल्युमिनियमची संयुगे व सिलिकांचा यात वापर होतो. आता आपण काही डिओंविषयी माहिती घेऊ. सर्वसाधारण डिओ: यामध्ये अॅल्युमिनियमच्या संयुगांचे प्रमाण कमी असते. या संयुगामुळे घामाचा वास कमी येतो. घाम रोखणारे डिओ:- हे डिओ शरीरातून येणाऱ्या घामाला प्रतिबंध घालतात. या डिओमध्ये अॅल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्सचे प्रमाण 15% असते. म्हणून त्वचेवरील छिद्रे बंद होतात व घाम स्रवण्याचे प्रमाण कमी होते. वैदयकीय डिओ :- ज्या व्यक्तींना खूप मोठया प्रमाणात घाम येतो व त्याचा शरीरावर घातक परिणाम होतो, त्यावर उपाय म्हणून वैदयकीय डिओ तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये 20% ते 25% अॅल्युमिनियमचे प्रमाण असते. हा डिओ फक्त रात्रीच वापरला जातो. डिओ हे स्थायू व वायू स्वरुपात असतात.