पदार्थ आपल्या वापरातील

दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ

views

04:55
आपण आपल्या रोजच्या जीवनात काही रासायनिक पदार्थांचे सेवन करतो. अशाच काही रासायनिक पदार्थांविषयीची माहिती आपण घेऊया. आपण खातो ते अन्न, वापरतो त्या वस्तू उदा. भांडी, घडयाळ, फ्रिज, कूलर तसेच विविध रोगांवरील औषधी व इतरही काही वस्तू हया वेगवेगळ्या द्रव्यांपासून बनवलेल्या असतात. यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तर आता आपण अशा काही पदार्थांविषयी माहिती घेऊ. तुम्ही मिठाईच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला विविध रंगांनी मिठाई सजलेली दिसते. त्या मिठाईमध्ये: लाल, पिवळा, हिरवा असे विविध रंग दिसतात. हे सर्व रंग फुड्स सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी इंडिया (FSSAI) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले असतात. तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टर तुम्हाला वेगवेगळी औषधे देतात. ती औषधे सेंद्रिय संयुगापासून बनवलेली असतात. ती प्रथम प्राणिमात्रांना आणि नंतर काही मानवी गटांना देऊन त्या औषधांचे परिणाम अभ्यासले जातात. आणि मग ती औषधे FDA (Food And Drug Administration) कडून प्रमाणित केली जातात.