पदार्थ आपल्या वापरातील

किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग

views

05:08
किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठी होतो असे नाही. तर वैज्ञानिक त्यांचा उपयोग संशोधन, कृषी, उद्योगधंदे, औषधी वनस्पती अशा अनेक क्षेत्रांमध्ये करतात. किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो. केवळ किरणोत्साराचा उपयोग करून आणि किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून. आता आपण नैसर्गिक किरणोत्सार व कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये यांविषयी माहिती घेऊ. नैसर्गिक किरणोत्सार :- साधारणपणे निसर्गामध्ये 82 ते 92 अनुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वंयस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात. अशा मूलद्रव्यांना नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्ये म्हणतात. कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये :- फ्रेडरिक जॉलिओ क्युरी व आयरीन जॉलिओ क्युरी या दांपत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सर्गाचा शोध लावला. प्रयोगशाळेत कणांच्या भडीमाराने घडणाऱ्या अणुगर्भ विघटन क्रियांमध्ये उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सारी मूलद्रव्यांना कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये असे म्हणतात. क्यूरी दांपत्याला या शोधाबद्दल 1935 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.