पदार्थ आपल्या वापरातील

अॅनोडायझींग

views

04:11
विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून अॅनोडायझींग केले जाते. हवेतील ऑक्सिजनची अॅल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर अभिक्रिया होऊन निसर्गतःच एक संरक्षक थर तयार होतो. अॅनोडायझींग प्रक्रियेत आपल्याला पाहिजे तितक्या जाडीचा थर तयार करता येतो. विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून अॅनोडायझींग केले जाते. विद्युत अपघटनी घटात विरल आम्लात अॅल्युमिनियमची वस्तू, धनाग्र म्हणून बुडवतात. विद्युत प्रवाह सुरु केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्रावर ऑक्सिजन वायू मुक्त होतो. ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन अॅल्युमिनियम वस्तूरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अॅल्युमिनियम ऑक्साइडचा थर तयार होतो. या प्रक्रियेच्या दरम्यान या घटामध्ये रंग टाकून हा थर आकर्षक बनवता येतो. तवे, कुकर, अशी विविध भांडी अॅनोडायझींग केलेली असतात.