पदार्थ आपल्या वापरातील

धुण्याचा सोडा

views

02:40
सर्व प्रथम आपण एक कृती करूया. विहिरीचे किंवा बोअरवेलच्या पाण्याचा एक नमुना चंचुपात्रात घेऊन त्यात साबण टाका आणि ते ढवळा. आता सांगा, यामध्ये कोणकोणते बदल झालेले तुम्हाला दिसून आले? वि:- विहीर किंवा बोअरवेलचे पाणी हे दुष्फेन म्हणजेच जड असते. त्यामुळे धुण्याचा सोडा टाकला की ते पाणी सुफेन म्हणजेच मृदू झाले. शि: बरोबर, हे दुष्फेन म्हणजे जड पाणी धुण्याचा सोडा टाकल्यानंतर सुफेन म्हणजेच मृदू होते हे त्यावर आलेल्या साबणाच्या फेसामुळे लक्षात आले. कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या क्लोराइडस व सल्फेट्सच्या अस्तित्त्वामुळे पाणी दुष्फेन होते. हे पाणी सुफेन म्हणजेच वापरण्यासाठी योग्य असे बनवण्यासाठी धुण्याचा सोडा Na2CO3 वापरतात. यामुळे सोडयाबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशिअम व कॅल्शिअमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. हे क्षार तयार होताना पुढीलप्रमाणे अभिक्रिया घडून येते. Mgcl2(aq) + Na2co3(s)  Mgco3 (s) + 2Nacl(aq) मॅग्नेशिअम क्लोराइड सोडिअमकार्बोनेट मॅग्नेशिअमकार्बोनेट सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट हा पाण्यात द्रावणीय असणारा सोडिअमचा क्षार आहे. स्फटिक स्वरूपातील सोडिअम कार्बोनेट नुसता ठेवला तर त्यातील स्फटिकजल उडून जाते व पांढरे चूर्ण मिळते. त्यालाच आपण धुण्याचा सोडा असे म्हणतो. Na2CO3.10 H2O →┴(- H_2 O) Na2CO3. H2O पांढरे चूर्ण (धुण्याचा सोडा)