पदार्थ आपल्या वापरातील

काही स्फटिकी क्षार

views

04:15
स्फटिक जल असणारे विविध क्षार आपल्या रोजच्या वापरात असतात. ‘स्फटिक रचनेमध्ये पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते. याला स्फटिकजल असे म्हणतात. आपल्या रोजच्या जीवनात खालील क्षार वापरात असतात. 1) तुरटी:- (potash Alum – K2SO4. Al2(SO4)3. 24H2O). : तुरटी ही औषधामध्ये वापरतात. जखमेतून रक्तस्त्राव थांबण्यासाठी, जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाणी निवळण्यासाठी तुरटी वापरतात. 2) बोरॅकस (Borax – Na2B4O7.10H2O): सौंदर्य प्रसाधन उद्योगात लोशन, शॅम्पू, कोल्डक्रीम बनवण्यासाठी, कपड्यावरील डाग काढण्यासाठी, प्रयोगशाळेमध्ये बोरॅक्स टेस्टच्या साहाय्याने रंगीत क्षारामधील मूलद्रव्ये शोधण्याकरिता बोरॅक्सचा वापर करतात. 3) ईप्सम सॉल्ट :- खते तयार करण्यासाठी तसेच झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी ईप्सम सॉल्टचा उपयोग करतात. बॉडी स्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी करतात. आंघोळीच्या पाण्यामध्ये (bath salt) म्हणून याचा वापर स्नायूंचे दुखणे कमी करण्याकरता करतात. 4) बेरीअम क्लोराइड :- बेरीअम क्लोराइडचा उपयोग ब्राइनच्या म्हणजेच (Nacl) सोडिअम क्लोराइडचे द्रावण शुद्ध करण्यासाठी होतो. वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी, तसेच कागद उदयोगामध्ये, डाय इंडस्ट्रीमध्ये, सिरमिक्स, तेल शुध्दीकरण करण्यासाठी त्याचप्रमाणे कीटकनाशक औषधांमध्ये बेरिअम क्लोराइडचा उपयोग करतात.