पदार्थ आपल्या वापरातील

ब्लिचिंग पावडर (विरंजक चूर्ण – caOcl2) कॅल्शिअम ऑक्सिक्लोराइड

views

03:12
पावसाळ्यामध्ये नळाच्या पाण्याला उग्र वास येत असतो. किंवा पोहण्याच्या तलावातील पाण्यालासुद्धा उग्र वास तुम्ही अनुभवला असेल. हा वास क्लोरीन वायूचा असतो. क्लोरीन वायू तीव्र ऑक्सिडीकारक असल्याने तो पाण्यातील जंतूंचा नाश करण्यासाठी वापरतात. तसेच हे वापरताना विरंजनाची क्रिया सुद्धा घडून येते. विरंजन म्हणजेच ब्लिचिंग. वायुस्वरूपातील क्लोरीन हाताळणे गैर सोयीचे असते. त्यामुळे विरंजक चूर्ण सर्वसामान्यपणे वापरण्यासाठी योग्य ठरते. हवेतील कार्बन डायऑक्साइडमुळे विरंजक चूर्णाचे हळुवारपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. या मुक्त झालेल्या क्लोरीनमुळे विरंजक चूर्णाला त्याचा गुणधर्म प्राप्त होतो. क्लोरीन वायू खालील रासायनिक अभिक्रियेने मुक्त होतो. कॅल्शिअम हायपोक्लोराइडची हवेतील कार्बनडाय ऑक्साईडशी रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शिअम कार्बोनेट व क्लोरीन वायू मुक्त होतो CaOCl2 + CO2  CaCo3 + Cl2 विरी गेलेल्या चुन्याची क्लोरीन वायू बरोबर अभिक्रिया झाल्यास विरंजक चूर्ण म्हणजेच ब्लिचिंग पावडर तयार होते. ते विरंजक चूर्ण खालील अभिक्रियेने मिळते.