पदार्थ आपल्या वापरातील

डाय

views

03:35
जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो, त्याला डाय असे म्हणतात. उदा. साडया, ड्रेस, इत्यादी. डाय हा पाण्यात द्रावणीय असतो म्हणजेच पाण्यात पूर्णपणे मिसळतो. तर तेलात अद्रावणीय असतो म्हणजेच डाय तेलात मिसळत नाही. अनेकदा कापड रंगवल्यावर दिलेला रंग पक्का होण्यासाठी रंगबंधक वापरतात. डायचे उपयोग : 1) केसाला रंग करण्यासाठी 2) रस्त्यावरील पाट्या अंधारात दिसाव्यात म्हणून फ्लुरोसंट म्हणजेच प्रतिदीप्तिशील डायचा वापर केला जातो. हा फ्लुरोसंट किरणोत्सारी पदार्थांपासून तयार केला जातो. 3) चामड्याचे बूट, पर्स, चपला यांना चमकदार रंग येण्यासाठी रंग वापरतात. डायचे दुष्परिणाम :- 1) केसाना रंग लावण्यासाठी डाय वापरल्याने केस गळतात, केसांचा पोत खराब होतो, त्वचेची आग होते, डोळ्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते. 2) लिपस्टिकमध्ये कॅरमाइन (carmine) नावाचा रंग असतो. या कॅरमाइन रंगामुळे ओठांना इजा पोहचत नाही. मात्र हा रंग पोटात गेल्यावर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो.