पदार्थ आपल्या वापरातील

किरणोत्सारी पदार्थ

views

04:15
युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला ‘किरणोत्सार’ (Radiation) असे म्हणतात. हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांस ‘किरणोत्सारी पदार्थ’ असे म्हणतात. किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक अस्थिर असते. अस्थिर अणुकेंद्रकातून किरणोत्सार होत असतो. किरणोत्सारी पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे. तर आता आपण या पदार्थांविषयी थोडे जाणून घेऊया. किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी प्रारणे तीन प्रकारची असतात: अल्फा, बीटा आणि गॅमा. या किरणोत्सारी प्रारणांचे स्वरूप जाणून घेऊ. किरणोत्सारी प्रारणांचे स्वरूप: रुदरफोर्डने 1899 साली रेडिअम उत्सर्जित करत असलेली प्रारणे वेगवेगळी असतात याचा शोध लावला. त्यांनाच अल्फा आणि बीटा प्रारणे असे म्हणतात. तर बिलार्ड यांनी तिसऱ्या गॅमा या प्रारणांचा शोध लावला. दोन विरुद्ध विद्यूतप्रभार असलेल्या पट्ट्यांमधून हे किरण जाऊ दिले तर ते अलग होतात. हीच पद्धत 1902 मध्ये रुदरफोर्डने मांडली. रुदरफोर्ड आणि विलार्ड यांनी वेगवेगळ्या किरणोत्सारी पदार्थांतून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे विद्युत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली. तेव्हा त्यांना प्रारणाचे तीन प्रकारात विभाजन झाल्याचे दिसून आले. ते पुढीलप्रमाणे: एक प्रारण ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाल्याचे आढळले. त्यांना अल्फा किरणे म्हणतात. तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे आढळले. त्यांना बीटा किरणे म्हणतात. आणि तिसऱ्या प्रारणांचे मात्र अजिबात विचलन झाले नाही. त्यांना गॅमा किरणे म्हणतात.