नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

प्रस्तावना

views

3:9
पृथ्वीवरील सजीवांना जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग होतो त्यांना ‘नैसर्गिक संसाधने’ असे म्हणतात. हवा, पाणी, जमीन ही महत्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. आज आपण नैसर्गिक संसाधनांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. हवा, पाणी, जमीन या नैसर्गिक संसाधनांपैकी सर्वप्रथम आपण हवेचे गुणधर्म पाहणार आहोत. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॅाक्साईड, आणि इतर काही वायू थोडया प्रमाणात असतात. ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला श्वासोच्छवासाठी तसेच ज्वलनासाठी होतो. कार्बन डायॅाक्साईड अग्निशामक नळकांड्यात वापरतात. तसेच वनस्पतींना त्यांच्या अन्ननिर्मिती मध्येही कार्बन डायॉक्साईडचा उपयोग होतो. नायट्रोजन मुळे सजीवांमध्ये प्रथिनांची निर्मिती होते.