नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

मृदेची रचना

views

4:1
मृदा ही कणांची बनलेली असते. आणि मृदेतील याच कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरुपात मृदेची रचना आढळून येते. स्तरीय :- मृदेच्या या रचनेमध्ये एकावर – एक थर बसलेले असतात. कणस्वरूप :- मृदेच्या या रचनेमध्ये बारीक – बारीक कण आढळून येतात. स्तंभाकार : स्तंभ म्हणजेच उभी खांबाप्रमाणे भासणारी रचना. ठोकळा स्वरूप :- ठोकळ्यांसारखी रचना या प्रकारात आढळून येते. वनस्पती संवर्धन :- वनस्पतींची वाढ होण्यासाठी मृदा खूप महत्त्वाची आहे.