नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

हवेचे गुणधर्म

views

4:12
हवा, पाणी, जमीन या नैसर्गिक संसाधनांपैकी सर्वप्रथम आपण हवेचे गुणधर्म पाहणार आहोत. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॅाक्साईड, आणि इतर काही वायू थोडया प्रमाणात असतात. ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला श्वासोच्छवासाठी तसेच ज्वलनासाठी होतो. कार्बन डायॅाक्साईड अग्निशामक नळकांड्यात वापरतात. तसेच वनस्पतींना त्यांच्या अन्ननिर्मिती मध्येही कार्बन डायॉक्साईडचा उपयोग होतो. नायट्रोजन मुळे सजीवांमध्ये प्रथिनांची निर्मिती होते. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॅाक्साईड, नायट्रोजन डायॅाक्साईड अशा वायूंचे मिश्रण असते. आणि या मिश्रणामुळेच हवेला “वस्तुमान व वजन” प्राप्त होते. या वरून हवेचा पहिला गुणधर्म सिद्ध होतो: हवेला वस्तुमान व वजन असते.