नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

पाण्याचे गुणधर्म

views

4:34
पाण्यालाच ‘जीवन’ म्हंटले जाते. कारण पाणी नसेल तर सजीव जिवंत राहूच शकत नाहीत. पाणी द्रव, वायू आणि स्थायू या तीन अवस्थामध्ये आढळून येते. पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत आढळते’. पाण्याला स्वत:चा आकार नसतो. परंतु त्याला आकारमान असते. ते ज्या भांड्यामध्ये असते त्याचा आकार त्याला प्राप्त होतो. पाण्यामध्ये काही पदार्थ बुडतात तर पाण्यावर काही तरंगतात. ज्या वस्तू जड असतात त्या बुडतात, तर हलक्या वस्तू पाण्यावर तरंगतात. जड व हलकेपणा हा पदार्थांच्या घनतेवर अवलंबून असतो.