नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

मृदा

views

4:32
जिच्यामुळे जमीन तयार होते अशी माती म्हणजे मृदा होय. खडक, माती, खडे, यापासून मृदा तयार होते. खडकांचा अपक्षय म्हणजेच झीज होते व त्यापासून अपरिपक्व मृदा तयार होते. माती, खडे, वाळू, कृमी, कीटक यांपासून तयार झालेल्या अपरिपक्व मृदेस परिपक्व होण्यास बऱ्याच वर्षाचा काळ जावा लागतो. मृदेमध्ये मातीचे कण, वाळू, दगड, खडक असे मातीचे अजैविक घटक असतात. तर वनस्पतींचे आणि प्राण्यांचे कुजलेले अवशेष यांसारखे जैविक घटक असतात.