नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

पाण्याचे असंगत वर्तन

views

2:58
साधारणत: कोणत्याही पदार्थाचे तापमान कमी केले तर त्या पदार्थाची घनता वाढते आणि त्याचे आकारमान कमी होते. परंतु पाणी हे याला अपवाद आहे. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्टय आहे; ते म्हणजे नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवांप्रमाणे पाण्याची घनता वाढत जाते. परंतु 4०C तापमाना पेक्षा कमी तापमान झाले तर पाण्याची घनता कमी होऊ लागते. म्हणजेच 4०C ला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. आणि जर 4०C पेक्षा पाण्याचे तापमान कमी केले तर त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. म्हणजेच 4०C पेक्षा तापमान खाली जाऊ लागल्यास पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात.