नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

मृदापरीक्षण

views

4:22
मृदापरीक्षण म्हणजेच ‘मातीची तपासणी’ करणे होय. आज विविध ‘विज्ञान केंद्रांमध्ये ‘ किंवा कृषीखात्यांमध्ये मातीचे परीक्षण करून देणारे विभाग शासनाने उघडलेले आहेत. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण समजते. मृदापरीक्षणात मातीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय घटकांचे प्रमाण, मातीचा पोत, तपासला जातो. मातीमध्ये कोणत्या खनिज घटकांची कमतरता आहे व त्यावर कोणते उपाय करावेत हे ठरवण्यासाठी मुख्यत्वे मृदापरीक्षण केले जाते.