नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

मृदेचा पोत

views

3:01
जमिनीचा पोत म्हणजे जमिनीतील वाळू, गाळ व चिकणमाती यांचे परस्परांशी असणारे प्रमाण होय. वाळू, गाळ व चिकणमाती योग्य प्रमाणात असलेली मिश्रमाती सर्वात उत्तम असते. जमिनीच्या पोतावर तिचे अनेक गुणधर्म व जमिनीतील पाण्याची संधारण क्षमता अवलंबून असते. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचे तीन प्रकार पडतात.