नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

(आकृती 3.9 घनतेचे परिणाम )

views

3:20
पाणी हे वैश्विक द्रावक असल्याने त्यात काही पदार्थ विरघळतात. कसे ते पाहूयात. विहीर किंवा तलावाच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे सोपे जाते. कारण समुद्राच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाणी खारे बनते व पाण्याची घनता वाढते. त्यामुळे पोहताना समुद्राच्या पाण्यावर सहज तरंगणे सोपे होते. द्राव्य :- ‘जो पदार्थ विरघळतो त्या पदार्थाला द्राव्य म्हणतात’ उदा. मीठ. द्रावक :- “ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्या पदार्थाला द्रावक म्हणतात” उदा. पाणी. द्रावण :- ‘जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते तेव्हा त्याला द्रावण असे म्हणतात. उदा. मिठाचे पाणी.