नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

हवेची आर्द्रता

views

4:42
हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण म्हणजेच हवेतील आर्द्रता होय. हवेतील हे आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. दिवसभरामध्ये हे प्रमाण बदलत असते. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे हवेच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरत असते. जसे रात्री किंवा पहाटेच्या वेळी आपल्याला दवबिंदू दिसतात. कारण यावेळी हवेचे तापमान कमी असते त्यामुळे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही कमी असते. त्यामुळे अशावेळी हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात म्हणजेच ‘दवबिंदूत’ रुपांतर होते. याउलट दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढत असते, त्यावेळेस हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशावेळी आपल्याला हवा कोरडी असल्याचे जाणवते. तसेच पावसाळ्यात किंवा समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते.