कार्य आणि ऊर्जा

कार्याचे एकक

views

2:43
कार्याविषयी माहिती घेतली आहे.कार्याच्या एककाविषयी जाणून घेऊया. सर्वसामान्य कार्य म्हणजे, बल आणि बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामाचा गुणाकार होय. तो सूत्राच्या रूपात असा मांडता येईल. कार्य= बल X विस्थापन SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन (N) तर विस्थापनाचे एकक मीटर (m) आहे. म्हणून SI पद्धतीत कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे. यालाच ज्यूल असे म्हणतात. जर 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असेल तर झालेले कार्य हे 1 ज्यूल झाले असे म्हंटले जाते. म्हणून, 1 ज्यूल = 1 न्यूटन X 1 मीटर CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाईन तर विस्थापनाचे एकक सेंटीमीटर cm आहे. म्हणून कार्याचे एकक डाईन सेंटीमीटर आहे. यालाच आपण अर्ग असे म्हणतो.