कार्य आणि ऊर्जा

ऊर्जा

views

4:17
बल आणि बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामांच्या गुणाकारास ‘कार्य’ असे म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेस ‘ऊर्जा’ असे म्हणतात. सामन्यपणे कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हंटले जाते. आपण कोणतेही काम करत असताना शरीरातील उर्जेचा उपयोग केला जातो. बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले उदा. वस्तू उचलणे. म्हणजेच “एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाले तर शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे आपण म्हणतो.” म्हणजेच वस्तूचे विस्थापन झाले की कार्य घडत असते. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. म्हणजेच कार्य = बल X विस्थापन.