कार्य आणि ऊर्जा

धन, ऋण व शून्य कार्य

views

3:20
आपण कार्य झाले असे म्हणतो परंतु, वैज्ञानिक भाषेमध्ये कार्य धन, ऋण किंवा शून्य झाले असे म्हंटले जाते. तर आता आपण धन, ऋण आणि शून्य कार्य याविषयी माहिती पाहूया. या कार्यांपैकी सर्वप्रथम आपण धन कार्याविषयी जाणून घेऊया. धन कार्य: पदार्थांचे विस्थापन जेव्हा बलाच्या दिशेने होते त्यावेळी बलाने केलेले कार्य धन असते. म्हणजेच ( θ=0) उदा: एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर खाली पडत असताना गुरुत्व बलाच्या दिशेने कार्य होते. त्याचप्रमाणे बंद पडलेल्या गाडीला धक्का दिल्यानंतर ती गाडी जर समोरच्या दिशेने विस्थापित झाली तर कार्य हे ‘धन कार्य’ होते. यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते. ( θ=0) त्या वेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. ऋण कार्य: पदार्थांचे विस्थापन हे जेव्हा बलाच्या विरुद्ध दिशेने होते तेव्हा केलेले कार्य ऋण असते. म्हणजेच (θ=180) उदा: गतिमान गाडीला जर ब्रेक मारले किंवा शिडीवरून वर चढत गेले तर आपण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो. म्हणजेच होणारे कार्य हे ऋण होते. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, ( θ=180) त्या वेळी त्या बलाने केलले कार्य ऋण कार्य असते शून्य कार्य: ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात त्यावेळेस बलाने केलेले कार्य हे शून्य कार्य असते. म्हणजेच ( θ=90) उदा: एखादा मोठा दगड हलवण्याचा प्रयत्न केल्यावरही दगडाचे विस्थापन झाले नाही तर ते कार्य शून्य असते. किंवा एखादा दगड आपण दोरीच्या टोकाला बांधतो व दोरी गोल-गोल फिरवतो तेव्हा एकसमान वर्तुळाकार केंद्रीय बल कार्यरत होते. म्हणून होणारे कार्य हे शून्य कार्य होते. म्हणजेच ज्या वळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात ( θ=90), त्यावेळी बलाने केलले कार्य शून्य कार्य केले असे आपण म्हणतो.