कार्य आणि ऊर्जा

गतिज ऊर्जेचे समीकरण

views

3:56
आता आपण गतिज ऊर्जेच्या समीकरणांचा अभ्यास करणार आहोत समजा m वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. u हा तिचा आरंभिक वेग आहे. (येथे u = 0 शून्य आहे कारण ती वस्तू स्थिर असून तिचा तो आरंभिक वेग आहे.) त्या वस्तूवर F एवढे बल लावले तर a एवढे त्वरण निर्माण झाले. t कालावधीनंतर तिचा अंतिम वेग v झाला. या कालावधीत झालेले विस्थापन s आहे. म्हणून आता आपण वस्तूवर झालेले कार्य काढूया. वस्तूवर झालेले कार्य: बल × विस्थापन ( W = F × S ) न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बल = वस्तुमान × त्वरण (F = ma ) ------------समीकरण (1) विस्थापन s = ut + 1/2 at2 या ठिकाणी आरंभिक वेग शून्य आहे म्हणून u=0 घेऊया. म्हणून s = 0 + 1/2 at2 ------ समीकरण (2) म्हणून बल W = ma X 1/2 at2 ------ समीकरण (1) व (2) वरून. बल W = 1/2 m(at)2 ------------ समीकरण (3) न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या समीकरणावरून. v = u + at म्हणून v = 0 + at म्हणून v = at (कारण 0 व at ची बेरीज केली.) म्हणून v2 = (at)2 ----- समीकरण (4) म्हणून बल W = 1/2 mv2 ------- समीकरण (3) व (4) वरून. गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय. म्हणून, K. E. = W म्हणून, K. E. = 1/2 mv2