कार्य आणि ऊर्जा

ऊर्जा रूपांतरण

views

4:29
उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा , प्रकाश उर्जा, यांत्रिक उर्जा आणि विद्युत ऊर्जा हे उर्जेचे प्रकार आहेत. एका प्रकारच्या ऊर्जेचे रुपांतरण दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते. स्थितिज उर्जेचे रुपांतर गतिज ऊर्जेत तर गतिज ऊर्जेचे रुपांतर स्थितिज ऊर्जेत होते.ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. १)जलविद्युत केंद्रामध्ये धरणाच्या साठवलेल्या पाण्याला मोठ्या नळाच्या साहाय्याने गतिज ऊर्जा प्राप्त करून देऊन त्यांच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. 2) औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत तर अणुउर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत होते. ३) दिवाळीतील फटाके वाजल्यानंतर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर ध्वनी, प्रकाश व उष्णता ऊर्जांमध्ये होते. ४) विजेवर चालणाऱ्या पंख्यामध्ये बटन चालू केले की विद्यूत ऊर्जेचे रुपांतर गतिज ऊर्जेत होते. पंखा फिरू लागतो. ५) इस्त्री सारख्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते.