संख्याज्ञान Go Back चार अंकी संख्या views 3:53 चार अंकी संख्या: आता आपण चार अंकी संख्येचे वाचन - लेखन कसे करतात ते पाहूया. मुलांनो, प्रतीके म्हणजे संख्यांना दिलेली चिन्हे होत. आता हा तक्ता पहा. यावरून तुम्हाला प्रतीके म्हणजे काय ते समजेल. पहा: या चित्रांत ‘ह’ नावाच्या पाकिटाचे प्रतीक हजारासाठी दिले आहे. ‘श’ नावाच्या पैशाच्या थैलीचे प्रतीक शतकासाठी दिले आहे. ‘द’ नावाच्या त्रिकोणाचे प्रतीक दशकासाठी आणि टिंबांची प्रतीके एककासाठी दिली आहेत. आता या तक्त्यातील क्र. ४ ची प्रतीके पहा. यातील संख्या आहे: २२०३. इथे दोन हजार आहेत म्हणून हजारची 2 पाकिटे दिली आहेत. शतक दोन आहेत म्हणून शतकाच्या थैल्यापण दोनच दिल्या आहेत. या संख्येत दशक स्थानी शून्य आहे. म्हणून दशकाचा एकही त्रिकोण दिला नाही. आणि एकक स्थानी 3 ही संख्या आहे. म्हणून तीन टिंबं दिली आहेत. अशा प्रकारे प्रतीके ओळखून आपण संख्या तयार करू शकतो. संख्येचे विस्तारित रूप तीन अंकी संख्या उजळणी: चार अंकी संख्या दिलेला अंक एकदाच वापरून नवीन चार अंकी संख्या तयार करणे पाच अंकी संख्यांची ओळख अक्षरी संख्यांचे अंकात लेखन स्थानिक किंमत संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे. संख्येचा लहान मोठेपणा चढता – उतरता क्रम सम व विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे