संख्याज्ञान

आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे

views

3:25
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे :- तुम्ही कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेला होता का? विजया : हो, आम्ही कर्नाटकात गेलो होतो. शि: तिथल्या दुकानांच्या पाट्या वाचता आल्या का तुला? विजया : नाही सर. विजया : सर, त्या आपल्याला वाचता येत नाहीत कारण त्यांची अक्षरे लिहिण्याची पद्धत वेगळी असते. तसेच त्यांची अंक लिहिण्याची पद्धतही वेगळी असते. मग नोटावर १,२,३, असे अंक लिहले तर ते त्यांना कसे समजेल? आणि त्यांच्यासारखे लिहिले तर आपल्याला नाही कळणार! म्हणून नोटांवरील संख्या अशा लिहिल्या पाहिजेत की त्या भारतातील सगळ्या लोकांना समजतील. एवढंच नाही तर परदेशातून आपल्या देशात येणाऱ्यांनाही समजतील. मग आपण दुसऱ्या देशात गेलो तर आपल्यालाही तिथल्या नोटांवरच्या संख्या कळायला हव्यात. म्हणूनच जगातल्या सगळ्या देशांनी असं ठरवलं आहे की, नोटांच्या किंमती, त्यांचे क्रमांक, आगगाडीच्या, बसच्या व विमानाच्या तिकिटांचे क्रमांक असं सगळं इंग्रजी अंकात छापायचं. म्हणूनच आपल्याकडे बस, रिक्षा यांचे क्रमांक इंग्रजीत लिहिले जातात. संख्या इंग्रजी अंक वापरून लिहिल्या की जगातल्या सगळ्या लोकांना समजतात. म्हणून इंग्रजी अंकांनाच आता ‘आंतरराष्ट्रीय अंक’ असे म्हणतात. ही पहा देवनागरी संख्या चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. देवनागरी संख्यांचे चिन्ह – ०,१,२,३,४,५,६,७,८,९ आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह – 0,1,2,3,4,5,6,7,8,9