संख्याज्ञान

अक्षरी संख्यांचे अंकात लेखन

views

2:59
अक्षरी संख्यांचे अंकात लेखन :- १. बासष्ट हजार सदतीस :- मुलानो या संख्येचे वाचन करताना शतकस्थानी कोणताही अंक नाही हे लक्षात येईल. म्हणून त्या ठिकाणी आपण शून्य लिहू. म्हणून बासष्ट हजार सदतीस या संख्येचे अंकात लेखन ६२,०३७ अशा प्रकारे होईल. २. सत्तर हजार दोनशे सहा :- मुलांनो, पहा, या संख्येत दशकस्थानी अंक नाही म्हणून त्या ठिकाणी शून्य लिहिला ७०,२०६. ३. तीस हजार एक :- मुलांनो, येथे शतक व दशक स्थानांचा उल्लेख होत नाही. म्हणून त्याचे लेखन ३०,००१ असे आहे. ४. पाच अंकी संख्येचे अंकात लेखन करताना पन्नास हजार चार ही संख्या अंकात लिहायची आहे. दह ह श द ए ती अशा पद्धतीने लिहूया. ५ ० ० ० ४ शि: मुलांनो, ९,५,६,१,८ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून पाच अंकी संख्या लिहा. वि: ९५६१८, ५६१८९, ५१८६९, १९५६८, ६५९८१. शि: खूपच छान!