संख्याज्ञान

दिलेला अंक एकदाच वापरून नवीन चार अंकी संख्या तयार करणे

views

2:29
दिलेला अंक एकदाच वापरून नवीन चार अंकी संख्या तयार करणे: आपण आणखी काही पद्धतीने चार अंकी संख्या तयार करू शकतो. आता ही आकृती पहा. यामध्ये एक चौकोन दिला आहे. आणि या चौकोनाच्या चारही बाजूंना एक एक अंक दिला आहे. आता या चार अंकांची अदलाबदल करून आपण संख्या तयार करू शकतो. या चौकोनाच्या कडांवर २,६,७.३ असे अंक दिले आहेत. पहा या अंकांपासून मी माझी चार अंकी संख्या तयार करतो. ती आहे २३७६ (दोन हजार तीनशे श्याहत्तर). पाहिलंत, किती सोप आहे! आता तुम्हीसुद्धा या चार अंकांतून वेगळ्या संख्या तयार करून सांगा बघू. २६७६-दोन हजार सहाशे त्र्याहत्तर, ६७३२ – सहा हजार सातशे बत्तीस, ७३२६ – सात हजार तीनशे सव्वीस, ३६७२ – तीन हजार सहाशे बहात्तर २७३६ – दोन हजार सातशे छत्तीस.शि: खूपच छान! अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या संख्या तयार करू शकता.