संख्याज्ञान

संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ

views

3:12
संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ :- एकशे पंचवीस ही संख्या आपण अंकांत १२५ अशी लिहितो. म्हणजे १२५ हे एकशे पंचवीस या संख्येसाठी वापरलेले एक चिन्ह आहे. पण या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ होतात. समजा गौरव तुला तुझ्या मित्राला १२५ रू द्यायचे आहेत आणि तुझ्याकडे १ रुपयाची खूप नाणी आहेत. तर तू कसे देशील? गौरव : मी १ रुपयाची १२५ नाणी देईन. शि: म्हणजेच इथे १२५ या संख्याचिन्हाचा अर्थ १२५ एकक असा होईल. आता समजा, सुधीरकडे १० रुपयांच्या काही नोटा आहे व १ रुपयांची काही नाणी आहेत तर तू १२५ रू कसे देशील? सुधीर :- मी १० रुपयाच्या १२ नोटा व १ रुपयांच्या ५ नाणी देईन. शि: छान! म्हणजेच नाणी नोटा याप्रमाणे १२५ चा अर्थ १२ दशक आणि ५ एकक असा होईल. आता समजा, अजितकडे १०० च्या काही नोटा, १० रुपयांच्या काही नोटा व १ रुपयांची काही नाणी आहेत. मग अजित तू १२५ रू कसे देशील? अजित :- मी १०० रू ची एक नोट, १०रू च्या २ नोटा व १रू ची ५ नाणी देईन. शि: अगदी बरोबर! म्हणजेच १२५ चा अर्थ १ शतक २ दशक व ५ एकक असा होईल.