संख्याज्ञान Go Back चढता – उतरता क्रम views 3:53 चढता – उतरता क्रम : मुलांनो, आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवतात याचा अभ्यास केला आहे. त्याचाच वापर करून आपण चढता व उतरता क्रम लिहायचा आहे. चढता क्रम लिहिताना दिलेल्या संख्यांतील सर्वात लहान संख्या अगोदर लिहावी, त्यानंतर त्या संख्येपेक्षा थोडी मोठी संख्या व शेवटी सर्वात मोठी संख्या लिहायची तर उतरता क्रम लिहीताना याच्या उलट करायचे. सर्वात मोठी संख्या आधी, त्यानंतर त्यापेक्षा लहान व शेवटी सर्वात लहान संख्या लिहावी. उदा. १० पायऱ्यांचा जिना आहे. राजूला तो जिना चढायचा आहे. जिना चढताना तो सर्वात आधी पहिली पायरी, नंतर दुसरी पायरी करत करत दहाव्या पायरी पर्यंत पोहचेल व उतरताना दहाव्या पायरीपासून पुन्हा पहिल्या पायरीपर्यंत उतरेल. पहा १२८४, ४२४, ६३६, १२२ या काही संख्या आहेत: या संख्यांचा चढता उतरता क्रम लावायचा आहे. दिलेल्या संख्येत तीन संख्या तीन अंकी आहेत व एक चार अंकी आहे. चढता क्रम लिहताना सर्वात लहान संख्या अगोदर घ्यायची. यातील १२२ ही सर्वात लहान संख्या आहे, म्हणून ती सुरूवातीला लिहली. त्यानंतर ४२४, ६३६, व १२८४ ही मोठी संख्या शेवटी लिहली. उतरता क्रम लिहिताना १२८४ ही मोठी संख्या अगोदर लिहिली, त्यानंतर त्या संख्येपेक्षा थोड्या लहान संख्या लिहून शेवटी सर्वात लहान संख्या लिहिली. म्हणून यांचा चढता क्रम होईल: १२२, ४२४, ६३६, १२८४ आणि उतरता क्रम होईल १२८४, ६३६, ४२४, १२२. संख्येचे विस्तारित रूप तीन अंकी संख्या उजळणी: चार अंकी संख्या दिलेला अंक एकदाच वापरून नवीन चार अंकी संख्या तयार करणे पाच अंकी संख्यांची ओळख अक्षरी संख्यांचे अंकात लेखन स्थानिक किंमत संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे. संख्येचा लहान मोठेपणा चढता – उतरता क्रम सम व विषम संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे