संख्याज्ञान

संख्येचे विस्तारित रूप

views

4:44
संख्येचे विस्तारित रूप :- मागील इयत्तेमध्ये आपण तीन अंकी संख्यांचे विस्तारित रूप कसे लिहावे याचा अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे आता आपण ४ व ५ अंकी संख्यांचे विस्तारित रूप लिहू. ३४,५२१ या पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप बघूया. अंकांच्या स्थानावरून आपण विस्तारित रूप मांडूया. येथे दशहजार स्थानावर ३ अंक आहे. हजार स्थानावर ४ अंक, शतक स्थानावर ५, दशकावर २ व एकक स्थानी १ अंक आहे. यावरून आपण विस्तारित रूप लिहू. ३४५२१ चा विस्तार आहे: ३०,००० + ४,००० + ५०० + २० + १ किंवा विस्तारित रूप लिहिण्याची आपण आणखी एक सोपी पद्धती बघूया. ५३,२१४ या संख्येचे विस्तारित रूप मांडताना स्थानानुसार दिलेल्या अंकांचे विस्तारित रूप पाहू. उदा. पहिला अंक ५ आहे पाचनंतर एकूण किती अंक आहेत तेवढे मोजून पाचवर तेवढे शून्य लिहायचे. अशाच प्रकारे कृती करायची. वरील उदाहरणात ५ या अंकानंतर ४ अंक आहेत म्हणून ५ च्या पुढे ४ वेळा शून्य लिहू. ३ नंतर तीन अंक आहेत, म्हणून ३ च्या नंतर ३ शून्ये लिहू. २ नंतर २ अंक आहेत, म्हणून २ नंतर दोन शून्ये लिहू. १ नंतर १ अंक आहे म्हणून १ नंतर १च शून्य लिहू. ४ नंतर कोणताच अंक नाही म्हणून ४ ची किंमत आहे तशीच असेल. म्हणून ५३२१४ चा विस्तार आहे: ५०००० + ३००० + २०० + १० + ४.