संख्याज्ञान

पाच अंकी संख्यांची ओळख

views

3:07
पाच अंकी संख्यांची ओळख: आपण चार अंकी संख्यांचे वाचन- लेखन तसेच दिलेल्या अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या याचा अभ्यास केला. आता आपण पाच अंकी संख्यांची ओळख करून घेऊया. सर्वात मोठी चार अंकी संख्या ९९९९ (नऊ हजार नऊशे नव्याण्णव) आहे. या संख्येच्या लगतची, पुढची संख्या काढण्यासाठी त्या संख्येत आपल्याला एक मिळवावा लागेल. आता आपण उभ्या मांडणीने बेरीज करून ही गोष्ट समजून घेऊया. पहा, या मांडणीत ९९९९ मध्ये १ मिळवला आहे. म्हणून याची सुरवात करताना प्रथम एककाच्या घरापासून करू. म्हणून ९ एकक + १ एकक मिळून १० एकक झाले. त्याचा १ दशक (हातचा) तयार झाला. म्हणून तो दशकाच्या घरात मांडू. आता दशकाच्या घरत ९ दशक + १ दशक मिळून १० दशक झाले. आणि १० दशक म्हणजे १ शतक. तो शतकाच्या घरात मांडू. आता शतकाच्या घरात ९ शतक + १ शतक मिळून १० शतक झाले. १० शतकांचा १ हजार होतो. तो आपण हजाराच्या घरात मांडू. हजाराच्या घरात ९ हजार + १ हजार म्हणजे १० ह झाले. म्हणून ती संख्या दहा हजार आहे. हे दहाहजार एकत्रित करून त्याला ‘एक दशहजार ‘ असे म्हणू.