संख्याज्ञान

स्थानिक किंमत

views

2:32
स्थानिक किंमत : मुलांनो, आता आपण स्थानिक किंमत कशी काढतात ते पाहूया. अंकाच्या स्थानावरून त्यांची स्थानिक किंमत ठरवत असतात. उदा. ५५,५५५ याचे विस्तारित रूप मांडले तर ५०,०००+५,०००+५००+५०+५ असे तयार होईल. संख्येत सर्व स्थानात ५ हाच अंक आहे पण प्रत्येकाची किंमत मात्र वेगवेगळी आहे. ३७८४२ या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू. पहा, ही संख्या ५ अंकी आहे. यामध्ये सुरवात आपण ३ पासून करायची आहे. ३ चे स्थान दशहजार आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत = ३०,००० तीस हजार होईल. ७ चे स्थान हजार आहे, म्हणून ७ ची स्थानिक किंमत ७,००० सात हजार होईल. शतकस्थानी ८ अंक आहे, म्हणून ८ ची किंमत ८०० होईल. दशक स्थानी ४ हा अंक आहे, म्हणून ४ ची स्थानिक किंमत ४० होईल. एककस्थानी २ हा अंक आहे म्हणून २ ची स्थानिक किंमत २ च राहील.