बल व दाब

प्रस्तावना

views

4:16
आपण जेव्हा कोणतीही वस्तू उचलतो, ढकलतो, सरकवतो त्यावेळेस आपल्याला आपली ताकद म्हणजेच शक्ती खर्च करावी लागते. यालाच आपण बल म्हणतो. आपण वस्तूला गती देतो, तेव्हाही बलाची गरज पडते फुटबॉलला लाथ मारली की तो गतिमान होतो. द्रव किंवा वायूशी संबंधित दाब ही संकल्पना आपण ऐकली आहे. एखादया द्रव किंवा वायू भरलेल्या वस्तूवर आपण दाब देतो तेव्हा त्या वस्तूच्या आतमध्ये असलेल्या द्रव किंवा वायूमध्ये हालचाल घडून येते. उदा: फुगा फुगवल्यानंतर त्यावर दाब दिला की आतील हवा आजूबाजूला गेल्यासारखी आपल्याला जाणवते. तसेच सोडा वॉटरची बाटली हलविल्यास आतील वायूत दाब निर्माण होतो आणि झाकण खोलल्यावर फेस बाहेर येतो. आता आपण या पाठात बल व दाब या दोन्ही संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची सरळ रेषेतील एकसमान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस बल असे म्हणतात.