अणूचे अंतरंग

प्रस्तावना

views

4:21
‘अणू’ या संकल्पनेचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केला आहे. एका सुईच्या टोकावर हजारो अणू असतात. म्हणजेच आपण कल्पनाही करू शकत नाही की, अणू किती लहान असेल! तर आता सर्वप्रथम तुम्ही मला द्रव्य म्हणजे काय, ते सांगा बरं ? वस्तू ज्यापासून तयार होते त्यास पदार्थ म्हणतात व पदार्थालाच शास्त्रीय भाषेत द्रव्य म्हणतात. डोळयांनी पाहता येणारा व ज्याचा अणूभव घेता येतो व वस्तू ज्यापासून तयार होते, त्या पदार्थाला द्रव्य असे म्हटले जाते. उदा: लाकूड, लोखंड, पेन, पेन्सिल, पुस्तक इत्यादी. बरं आता तुम्ही मला अणू म्हणजे काय.मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात.रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या व मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या मुलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात. अणू हा द्रव्याचा सर्वात लहान घटक आहे. द्रव्य हे रेणूंचे बनलेले असतात. रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. सर्व भौतिक व रासायनिक बदल घडताना आपली ओळख कायम ठेवणारा मूलद्रव्याचा लहानात-लहान कण म्हणजेच अणू होय. अणु डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु कोटयावधी अणू एकत्र आले की, त्यांचे आकारमान डोळ्यांना दिसण्याइतपत मोठे होते. आपण या पाठामध्ये अणूंच्या अंतरंगाविषयी विस्ताराने माहिती अभ्यासणार आहोत.