विद्युतधारेचे परिणाम

प्रस्तावना

views

3:24
ज्या पदार्थातून विद्युत वहन होते, त्या पदार्थाला आपण विद्युत सुवाहक असे म्हणतो. उदा. चांदी, अॅल्युमिनिअम, तांबे. तर ज्या पदार्थातून विद्युत वहन होत नाही त्या पदार्थाला विद्युत दुर्वाहक म्हणतात. उदा. लाकूड, रबर. विद्युत प्रवाहातील मुक्त इलेक्ट्रॉन्स इतस्तत: फिरत असतात. वाहकातून वाहत असताना त्यांच्या मार्गामध्ये आलेल्या वाहकाच्या अणूंवर ते आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा येतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. अशी पदार्थाची रोधकता खूप कमी असल्यास त्या पदार्थाला विद्युत सुवाहक म्हणतात. उदा. तांबे, चांदी, अॅल्युमिनिअम या पदार्थाची रोधकता खूप कमी आहे. आपण स्थितिक ऊर्जेविषयी मागील इयत्तेत अभ्यास केला होता. तसेच ऋणप्रभार व धनप्रभारित वस्तूंविषयी विविध प्रयोग केले होते. उदा. काचेचा रॉड किंवा नळी रेशमी कपड्यावर घासणे. ऋणप्रभारित कण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाऊन ती वस्तू धनप्रभारित कशी होते हेही आपण पाहिले. आता आपण विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा, विद्युतरोधातून जाणारी विद्युत धारा, विद्युत प्रवर्तन, विद्युतचलित्र व विद्युत जनित्र यांचे कार्य या पाठात अभ्यासणार आहोत.