विद्युतधारेचे परिणाम

विद्युत जनित्र

views

5:26
विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित आपण अनेक प्रयोग पाहिले. या प्रयोगांमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युतधारेचे परिमाण/परिणाम अल्प होते. परंतु हेच तत्त्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरता येते. विद्युत जनित्र म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण होय. येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युतवाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीजनिर्मितीसाठी केला जातो. आपल्याला विद्युत जनित्राची रचना दाखविते. यात ABCD हे आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल शक्तीशाली चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये म्हणजे उत्तर (N) व दक्षिण (S)ध्रुवांमध्ये ठेवलेले असते. कुंडलाची दोन टोके R1 आणि R2 या दोन विद्युतवाहक कड्यांना B1 आणि B2 या कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही कडी आसाला म्हणजे अक्षाला धरून बसवलेली असतात, पण कडी व व आस यांमध्ये विद्युतरोधी आवरण असते. B1 आणि B2 या स्थिर कार्बन ब्रशांची टोके गॅल्व्हानोमीटरला(G) जोडलेली असतात. त्यामुळे विद्युतधारेची परिपथातील वहन दिशा कळून येते. अशी ही विद्युत जनित्राची रचना असते. दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युतचलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेले असते. त्यामुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी एक शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट विद्युतधारेत (DC) करणाऱ्या त्या विद्युत जनित्राला दिष्ट विद्युतधारा जनित्र म्हणतात.