विद्युतधारेचे परिणाम

हे करून पहा

views

3:45
कृती करण्यासाठी आपल्याला पुठ्ठा, तांब्याची जाड तार, चुंबकसूची, लोखंडाचा कीस हे साहित्य लागणार आहे. प्रथम परिपथाची जोडणी करा. पुठ्ठ्यातून आरपार जाणाऱ्या तांब्याच्या जाड तारेतून जेव्हा मोठी म्हणजे सुमारे 1 अॅम्पिअर किंवा अधिक विद्युतधारा वाहते, तेव्हा पुठ्ठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबकसूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी सुची विशिष्ट दिशेत स्थिर राहते असे आपल्याला दिसून येते. पुठ्ठ्यावर पेन्सिलीने ती दिशा दर्शवू. परिपथात विद्युतधारेची दर्शवलेली दिशा ही संकेतमान्य दिशा आहे. तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यावर चुंबकसूचीचे विचलन होते. विद्युतधारा वाढवल्यास हे विचलन वाढते. चुंबकसूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? विद्युतधारा कायम ठेवून चुंबकसूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास सूचीचे विचलन वाढते. जर आपण चुंबकसूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? विद्युतधारा कायम ठेवून चुंबकसूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास सूचीचे विचलन कमी होते. आता चुंबकसूची ऐवजी लोखंडाचा कीस पुठ्ठ्यावर पसरवा आणि निरीक्षण करा. निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसते की लोखंडाचा कीस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावताना दिसतो. परंतु असे का घडते हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल.