विद्युतधारेचे परिणाम

विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम

views

2:42
विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम बघण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. एक विद्युत परिपथ तयार करा. A व B दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड, सरळ तांब्याची तार जोडा. तिच्या शेजारी चुंबकसूची ठेवा. आता परीपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा. काय दिसले, हे लक्षात घ्या. आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडून चुंबकसूचीची दिशा पहा. विद्युतधारेची दिशा व चुंबकसूचीची स्थिती यांचा काही संबंध आढळतो का? या प्रयोगावरून आपल्या असे लक्षात येते की, तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. या प्रयोगात आपल्याला असे दिसून येते की, जेव्हा तारेतून विद्युतधारा प्रवाहित होत नाही, तेव्हा तारेजवळील चुंबकसूची दक्षिणोत्तर दिशेत स्थिर असते. याउलट तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास, चुंबकसूची दक्षिणोत्तर स्थिर न राहता तिचे विचलन होते. एकोणिसाव्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी विद्युतचुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळची चुंबकसूची काही कोनातून वळते. विद्युत व चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले.