विद्युतधारेचे परिणाम

विद्युतधारेचे औष्णिक परिणाम

views

5:30
आपण आपल्या घरात विजेवर चालणाऱ्या बऱ्याच वस्तू वापरतो. उदा. बल्ब, स्वयंपाकाची विजेची शेगडी, हीटर, इस्त्री इत्यादी. या वस्तूंमध्ये उष्णता कशी निर्माण होते ते आता आपण पाहूया. विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते, यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. या इलेक्ट्रॉनच्या अंगी असलेल्या स्थितिज ऊर्जेच्या काही भागाचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. त्यामुळे वाहकाचे तापमान हळूहळू वाढत जाते. यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणतात. पाणी गरम करण्यासाठी वापरात असलेला बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. या उपकरणांमध्ये ज्या पदार्थाची रोधाकता जास्त आहे अशा वाहकपदार्थाचा उपयोग केला जातो. विजेच्या शेगडीचे कुंतल हे नायक्रोम या मिश्रधातूचे असून या कुंतलाचा उपयोग विद्युतरोध म्हणून करतात. तसेच विजेच्या बल्बमध्ये देखील जे कुंतल असते ते टंगस्टन तारेचे असते. विद्युतरोधामुळे ही तार तापते. ही तार सुमारे 34000c पर्यंत तापते व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेचेही काही प्रमाणात प्रारण होते. अशाप्रकारे आपण या कुंतलाचा उपयोग करून आपल्या घरात विद्युत ओव्हन, विद्युत टोस्टर, विद्युत गीझर, विद्युत किटली, वितळतार म्हणजेच Fuse या उपकरणांचा वापर करतो.