विद्युतधारेचे परिणाम

विद्युतचलित्र

views

3:52
ऊर्जेची विविध रूप आपल्याला माहितच आहे. उदाहरणार्थ यांत्रिकऊर्जा, सौरऊर्जा, चुंबकीय ऊर्जा इत्यादी. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हेही आपल्याला ठाऊक आहे. विद्युतऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युतचलित्र होय. आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात हे विद्युतचलित्र म्हणजे वरदानच म्हंटले पाहिजे. विद्युतचलित्राचा वापर पंखे शीतकपाटे, मिक्सर, धुलाई यंत्र, संगणक, पंप यांमध्ये केलेला दिसतो. विद्युतचलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे कुंडल नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांमध्ये आकृतीत दाखविल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवलेले असते की, त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. कुंडलाची दोन टोके X व Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते व ते आकृतीत दाखविल्याप्रमाणे चलित्राच्या आसाला पकडून बसविलेले असते. X व Y अर्धकड्यांच्या बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रश E व F यांना स्पर्श करतो.