विद्युतधारेचे परिणाम Go Back चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल views 3:15 स्टँडचा वापर करून लवचिक तार नालचुंबकाच्या ध्रुवांमधून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करा. नंतर परिपथाची जोडणी करून काय आढळते ते पहा. परिपथाची जोडणी केली असता असे आढळून येते की, तारेतून विद्युतधारा वाहात नाही, तेव्हा तार सरळ राहते. म्हणजेच आकृतीत दाखविल्याप्रमाणे स्थिती A मध्ये राहते. जेव्हा वरून खाली अशी विद्युतधारा वाहाते तेव्हा तार वाकते आणि C या स्थितीत येते. तसेच जर आपण विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर केली तर तार वाकते आणि B या स्थितीत येते. म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेने आहे. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा N कडून S कडे H अशी आहे. या प्रयोगातून असे दिसून येते की, जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युतवाहकातून जाते, तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते. विद्युतधारेची दिशा उलट केली तर बलाची दिशाही उलट होते. आपण विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली. आणि आपल्याला असे आढळले की, बलाची दिशा या दोन्हींच्या लंब दिशेस आहे. या तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमात फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने सुबद्धपणे मांडल्या त्या नियमालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात. प्रस्तावना विद्युतपरिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण विद्युतधारेचे औष्णिक परिणाम माहीत आहे का तुम्हांला? विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम हे करून पहा विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल विद्युतचलित्र माहिती मिळवा फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम विद्युत जनित्र