विद्युतधारेचे परिणाम Go Back माहिती मिळवा views 4:03 ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते, त्या प्रक्रियेला विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणतात. वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल अथवा वाहक स्थिर राहून त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र बदलत असेल, तर वाहकात विद्युतधारा निर्माण होते. म्हणजेच प्रवर्तित होते. चुंबकीय प्रवर्तनाचा शोध मायकेल फॅरेडे याने 1831 मध्ये व जोसेफ हेन्री याने 1830 मध्ये स्वतंत्रपणे लावला. विद्युत चलित्र या यंत्राचे जे तत्त्व आहे, त्याच तत्त्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे, ते म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर. या उपकरणाचा उपयोग परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. याने विद्युतधारेची दिशाही समजते. यात काही बदल करून याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. उदाहरणार्थ गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्याने विद्युतप्रभार, विद्युतधारा व विद्युतविभवांतर याचे मापन करता येते. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की, पुढे त्याला गॅल्व्हॅनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी म्हणजे 1 मिलीअँपिअर किंवा त्याहूनही कमी विद्युतधारा कुंडलातून जाते तेव्हा कुंडलाचे परिवलन होते. हे परिवलन व पर्यायाने तबकडीवरील काट्याचे विचलन विद्युतधारेच्या प्रमाणात असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार गॅल्व्हॅनोमीटरमधील काटा शून्याच्या दोन्ही बाजूंकडे विचलित होतो. या प्रयोगावरून आपल्या लक्षात येते की, कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युतधारेत बदल केला तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. प्रस्तावना विद्युतपरिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण विद्युतधारेचे औष्णिक परिणाम माहीत आहे का तुम्हांला? विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम हे करून पहा विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल विद्युतचलित्र माहिती मिळवा फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम विद्युत जनित्र