विद्युतधारेचे परिणाम Go Back विद्युतपरिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण views 2:14 विद्युतपरिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते हे पाहण्यासाठी एक प्रयोग करू. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: जोडणीच्या तारा, विद्युतघट, विद्युतरोध, अॅमीटर, व्होल्टमीटर, प्लगकळ इत्यादी. कृती: प्रथम योग्य त्या मूल्यांचे घटक घेऊन परिपथ जोडा. नंतर परिपथामधील विद्युतधारा (I) मोजा, विद्युतरोधाच्या दोन टोकांमधील म्हणजेच A व B यांमधील विभवांतर (VAB) मोजा. यावरून लक्षात येते की A येथील विभव हे B येथील विभवापेक्षा जास्त आहे. कारण A हा बिंदूच्या विद्युतघटाच्या धन टोकाला आहे, तर B हा बिंदू विद्युतघटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. जर Q इतका विद्युतप्रभार A पासून B कडे गेला तर, या विद्युतप्रभारावर A पासून B पर्यंत जाताना (VAB Q) विभवांतर AB × विद्युतप्रभार Q इतके कार्य झाले. ऊर्जेचा स्रोत तर घट आहे मग हे कार्य करायला ऊर्जा कोठून आली? तर मुलांनो, घटाने ही ऊर्जा विद्युतप्रभारामार्फत विद्युतरोधाला दिली, जेथे कार्य (VAB Q) विभवांतर AB × विद्युतप्रभार Q घडले. Q हा विद्युतप्रभार t या वेळेत A पासून B कडे गेला. म्हणजेच हे कार्य जर t या वेळेत घडले तर त्यावेळेत (VAB Q) विभवांतर AB × विद्युतप्रभार Q इतकी ऊर्जा विद्युतरोधाला दिली गेली. नंतर ही विद्युतऊर्जा विद्युतरोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युतरोधाचे तापमान वाढते. प्रस्तावना विद्युतपरिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण विद्युतधारेचे औष्णिक परिणाम माहीत आहे का तुम्हांला? विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम हे करून पहा विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल विद्युतचलित्र माहिती मिळवा फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम विद्युत जनित्र