विद्युतधारेचे परिणाम

विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र

views

4:08
सरळ विद्युतवाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांविषयी आपण पाहिलेच आहे. तर मुलांनो, हाच विद्युतवाहक एका वेटोळाच्या आकारात वाकविल्यास विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील? विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा समकेंद्री वर्तुळाच्या रुपात असतात. या आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वेगवेगळे घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात आला आहे. वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातील. जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की त्याचा कंस सरळ रेषेने आपल्याला दाखवता येईल. नालकुंतल म्हणजे विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन केलेली कुंडलांची मालिका होय. B – बॅटरी, K- प्लगकळ, I – विद्युतधारा, N – उत्तरध्रुव, S – दक्षिणध्रुव. नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना या आकृतीत दर्शविली आहे. या आकृतीचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की, चुंबकपट्टी भोवती चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या दिसतात. म्हणजेच नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबकपट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा पट्टीचुंबकाच्या चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात. नालकुंतलाचे एक टोक दक्षिण ध्रुव तर दुसरे टोक उत्तरध्रुव म्हणून कार्य करते. या आकृतीप्रमाणे नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ असा होतो की, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते.