विद्युतधारेचे परिणाम

फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम

views

5:46
कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवितानाही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. मागील प्रयोगावरून असे समजते की, कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. ह्यालाच फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात. तसेच कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा म्हणतात. विद्युतवाहकामधील (कुंडलातील) प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल? तर जेव्हा विद्युतवाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा. प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताणा की ते एकमेकांना लंब दिशेत असतील. अशा स्थितीत अंगठा विद्युतवाहकाच्या गतीची दिशा तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविते. या नियमाला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. आपण आतापर्यंत विद्युतघटाकडून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एक दिशेने वाहणाऱ्या अदोलयमान विद्युतधारेशी परिचित झालो. नेहमी एकाच दिशेत वाहणाऱ्या अदोलयमान विद्युतधारेला दिष्ट विद्युतधारा म्हणतात. येथे धारेचे परिमाण बदलू शकते, पण दिशा बदलत नाही.