विद्युतधारेचे परिणाम

माहीत आहे का तुम्हांला?

views

6:08
घरामध्ये MCB (Miniature circuit Breaker) नावाने ओळखली जाणारी एक कळ बसविली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळतारच वापरली जाते. विद्युतमंडळाकडून दर महिन्याला येणारे वीज वापराचे देयक तपासा. त्यातील विविध बाबींची माहिती करून घ्या. वीज बिलात वीज वापर 'युनिट' मध्ये देतात. हे युनिट काय आहे? 1 किलोवॅट अवर(hour) इतकी विद्युत ऊर्जा वापरल्यास त्याला 1 युनिट असे म्हणतात. विद्युतमंडळाकडून येणाऱ्या वीजबिलात आपल्या घरातील वीजमीटरचा नंबर असतो. तसेच आपला संपूर्ण पत्ता असतो. त्या बिलावर आपण कोणत्या तारखेपासून किती युनिट वीज वापरली त्याची नोंद आणि त्यावर आकारण्यात आलेली रक्कम यांची नोंद केलेली असते. तसेच मागील काही महिन्यांत वापरलेल्या विजेची युनिट आणि रक्कम यांची नोंद असते.